मराठी कविता संग्रह

ऐक पावसाची धून

00:32 Sujit Balwadkar 0 Comments Category :


Share on Facebook

ऐक पावसाची धून येता आभाळ भरून
सुसाट या वाऱ्यावर येते आठव फिरून

कोसळता मेघमाला आले डोळे ही भरून
तुझ्या सवे भिजलेली ती सांज येई परतून ,

बरसती मेघ बघ होऊनिया अनावर
मनातल्या आठवांची रिमझिम डोळा धार

स्वप्नातल्या जगालाही वास्तवाचा होई भार
जपताना भाव सारे मनी कल्लोळच फार ,

आभास ही प्रेमाचा हा वाटे आता खरा खुरा
निर्माल्य त्या भावनांचे होई मनामध्ये गोळा

विरहाच्या आगीला या मिळे स्वप्नांची आहुती
क्षण क्षण जपताना साठवण होई रिती .

- अंजली राणे वाडे : २५/०६/१३. वसई .

RELATED POSTS

0 अभिप्राय