मराठी कविता संग्रह

शब्दांशी खेळता खेळता

17:56 सुजित बालवडकर 2 Comments Category :

शब्दांशी खेळता खेळता कवितेचा जन्म झाला
का, कश्या, कुणास ठाऊक प्रसव-वेदना कुठून आल्या

कवितेला वाढवता वाढवता एक मात्र लक्षात आले
शब्दांनीच शब्दांसाठी कवितेला ओटीत घातले ,

बालहट्ट संपले सारे कविता आता प्रौढ झाली
कवितेशी खेळता खेळता शब्दानाही धार आली

वास्तवाचे चटके सोसून कविता जेव्हा घायाळ झाली
शब्दांचीच ताकद तिला परत परत सावरून गेली ,

रसिक माय-बाप भेटीस तुमच्या लेकीस आता पाठवत आहे
चुकले-माकले माफ करा शब्दांचीच दाद तिला हवी आहे

शब्दच तिचे सखे सोबती शब्दच तिचे जीवन आहे
शब्दांशी ऋणानुबंध जपण्यासाठी कौतुकाची एक थाप हवी आहे .

- अंजली राणे वाडे : ११/०५/१३.वसई .

RELATED POSTS

2 अभिप्राय

  1. shrikant patil27/09/2013, 03:05

    शब्दांशी खेळता खेळता..खूप छान कविता शब्दांशी खेळतां खेळता वास्तव चांगलेच रेखाटलेत … कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे.


    shrikant v patil

    ReplyDelete
  2. mi faqt ek shabd ahe....
    tyacha khup motha arth ahe..
    artha vina mi verth ahe...
    mi faqt ek shabd ahe.....

    ReplyDelete