मराठी कविता संग्रह

जोगवा

20:48 Sujit Balwadkar 0 Comments Category :कमरेला लक्तरं गुंडाळून,
कपाळावर मळवट भरुन,
भोवळ आणणा-या
डफाच्या आवर्तात
उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारत
जोगवा मागत फिरतोय
पोतराज !

वंचनेचे मळवट भाळी
मिरवत,
तथाकथित प्रेमाची लक्तरं कमरेला गुंडाळून
भोवळ आणणा-या
सामाजिक मूल्यांच्या आवर्तात
आत्मताडनाचे फटकारे
मारते स्वतःला. . . .
आदिमाये
मला
मुक्तीचा जोगवा दे !

- माधवी भट

Text & Image courtesy: BG Limaye

RELATED POSTS

0 अभिप्राय