मराठी कविता संग्रह

आठवतंय ?

15:34 Sujit Balwadkar 0 Comments Category :आठवतंय?
किती कापऱ्या आवाजात विचारलं होत मी
"जाऊ.?"
अन तू.?
नाही, तो तू नव्हतासच
तो एक कोरडा आवाज होता फक्त
"जा..."
तिथेच साऱ्या शक्यता मावळल्या..

तिथून पुढे सारच शक्य झालं
म्हणून आता मी हि शब्द बदललेत.
कदाचित अर्थ तोच...
पण संदर्भ ते नाहीत.
कारण...

"आता काहीही शक्य.!"

- ममता सिंधुताई

RELATED POSTS

0 अभिप्राय