मराठी कविता संग्रह

कसं सांगू वेडाबाई

15:32 Sujit Balwadkar 0 Comments Category :तावातावाने भांडण आवडत मला..तुझ्यासोबत.
त्या दिवशी पण तेच झालं..
तुझ्यासारख्या " नास्तिक " माणसाला
" देवाचा गाव " दाखवायला निघाले होते.
आणी " तू "?
तुझ्या वाळवंटातून बाहेर यायला तयार नव्हतास.

" तुझा देव दाखव आधी..."

" दाखवायचा काय..आहेच तो..इथेच आहे..तुझ्यात...माझ्यात सगळीकडेच.."

" काय सांगतेस..तुझ्यातही आहे..?"

" हो..आहेच मुळी.."

"नक्की?"

"होय."

" मग तू ही तुझ्या देवासारखीच...सगळीकडेच असणार...?"

" हं..? हो..हो..आहेच.."

" बघ हं "

" हो म्हणाले ना.."

" नाही ग...एका ठिकाणी नाहीस तू..."

" ? "

" कसं सांगू वेडाबाई..माझ्या नशिबात नाहीस ग...!"

- ममता सिंधुताई

RELATED POSTS

0 अभिप्राय