मराठी कविता संग्रह

पाणी काढणारे लोक

15:15 Sujit Balwadkar 2 Comments Category :पिवळ्या कोरड्या नदीपात्रात
खड्डे खणून
पाणी काढाणारे लोक

जसे
सुरकुतल्या ओघळत्या
लोंबत्या स्तनातून
जीव खाउन
पाणी शोषणारे तान्हे पोर

आपली आई मरून गेलीये
हे पोराला कळत नाही
तसंच
त्या पाणी उकरणार्‍या
माणसांनाही

- अनिल अवचट

Text & Image courtesy: BG Limaye

RELATED POSTS

2 अभिप्राय