मराठी कविता संग्रह

माझा गुंजारव

21:28 सुजित बालवडकर 1 Comments Category :


मी पाकळ्यांच्या आड दडुनी
उगा पाहिले तिजला
माझ्या सौम्य गुण-गुणीतही
काळा मेघ गरजला
मी लपलो काट्यांच्या मागे
दंश त्यांचे घेत विखारी
ती फुलराणी सावलीतली
मी उन्हातला रे भिकारी
ते शहाणे पंख घेऊनी
चोरती फूलांचा रंग
माझा गुण-गुण वाजत राही
तुझ्या अंगणी मृदूंग
मी मधुकर चाखतो हा
नसे पूष्पव्यापार
वेडी आशा येशील कधी तू
उचलशील मज अलवार
सखी माझी सोडून गेली
मज सांजेच्या किरणात
येईल ती अथवा मांडून घेईन
मीच मला सरणात
मकरंदाचे निमित्त साधून
करतो मी आर्जव
अरे फूलांनो प्रियेस सांगा
माझा गुंजारव...

- उनाड

RELATED POSTS

1 अभिप्राय