मराठी कविता संग्रह

मी नाश होणारे, धुम्रवलय निमिषात

21:34 Sujit Balwadkar 0 Comments Category :


मी भरकटलो वा धडपडलो
हात द्याया कुणीच नव्हते
कुणी असावे सोबत
असेही मुळीच नव्हते
कुणासाठी काही जपलेले
असे स्वप्नही काही नव्हते
आणि जे पाहिले स्वप्नी
ते या जगात काहि नव्हते !!!
मी हृदयावरचा घाव
कधी सोसला नाही
अन् प्रेम नावाचा सर्प
अंतरी पोसला नाही
ना कधि जमला दृष्टीपटलावर
गुलाबी अस्तरं
ना छाताडा भिडले कूणा
नजरेचे विखारी शरं !!
मी ना वैरी, ना कुणी संत
मी डोळ्यात गहिरा
मी विचारी निशांत
मी मनस्वी ...
मी अनंती ...
मी नाश होणारे,
धुम्रवलय निमिषात ...

- उनाड

RELATED POSTS

0 अभिप्राय