मराठी कविता संग्रह

का ?

18:39 सुजित बालवडकर 0 Comments Category :

रस्ते असतात सरळ साधे तरीही वळणे नागमोडीच का ?
चिमूटभर सुखासाठी आयुष्यच दु:खाकडे गहाण का ?

शिशिरातल्या पानगळी शिवाय वसंत तरी फुलेल का ?
ऋतू सुद्धा बदलले जेथे नाते तरी आता टिकेल का ?

अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेलेत सारेच जण
मृगजळामागे धावता धावता हरवून बसलेत सुखाचे क्षण

वजीरच आता वरचढ इथे कुठली राणी राजा कोण ?
घाई फक्त जिंकण्याची तत्वांसाठी लढणार कोण ?

नको ऊभारुस पांढर निशाण निषेध राहू दे नावालाच
म्यानातल्या तलवारीची धारच झालीय बोथट साफ

माणुसकीचा बाजार आता मांडलाय कुठे एवढेच सांग
कोणते लेबल, कुठला ब्रांड , कोणता अम्बेसेडर विकतोय सांग .

- अंजली राणे वाडे
१६/0४/१३ | वसई

RELATED POSTS

0 अभिप्राय