मराठी कविता संग्रह

एक माणूस

19:38 सुजित बालवडकर 0 Comments Category :

एक माणूस..रंगत रंगत..हळूच मधे..घड्याळ बघतो
एक माणूस..टोले तास..अंगावरती..मिरवून घेतो
एक माणूस..सोयीस्करशी..आठवेल तेवढीच..कविता म्हणतो
एक माणूस..तरंगतो..दार लावतो..वावरतो
एक माणूस..आपल्या घरास..आपले कुलूप..आपण लावतो
एक माणूस..असतोही..नसतोही..दिसतो तेव्हा
एक माणूस..भरवशाचा..असा भरवसा..कोणी द्यावा !
एक माणूस..पावा घेईल..बघता बघता..रावा होईल
एक माणूस..त्याचे काही..होण्याचेही..राहून जाईल..



- संदीप खरे




आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

0 अभिप्राय