सत्यजित रे, थापा आणि शंकर्याचे बाबा
सत्यजित रे, थापा
आणि शंकर्याचे बाबा, एकदम गेल्याचं कळलं
आपल्याला असं नेहमीच कुणीकुणी गेल्याचं कळतं
आणि मग नेमकं काय बोलायचं, नेमकं काय वाटतं,
काहीच कळत नाही
काहीतरी वाटत मात्र रहातं
तसा, रे मला खुप आवडायचा
गरिबांचं, दु:खाचं किती छान चित्र काढायचा !
आणि फॉरेनला घेउन जायचा
पण त्याची चित्रं खूप लांब,
आकाशवाणीच्या थेट्रात लागायची
आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.
अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
मग बसनं जायचं-यायचं
म्हणजे कुले आंबून जायचे
रे गेला तर मोठ्या लोकांना खूप खूप दु:ख झालं
हाफिसातले लोक म्हणाले
त्याचे शिनेमे खूप कटांळवाणे वाटायचे
मग मला कसंसंच वाटलं
रेला त्यांनी तडीपार केलं नाही
कारण, त्यानं कधी छपरावरून उड्या नाही मारल्या
थापाचं काय, कधी आत असायचा
कधी बाहेर असायचा
काही लोक उगाचच त्याच्याबद्दल काहीबाही बोलायचे
त्यालाही गरिबांबद्दल खूप वाटायचं
मग तो कुणाच्यातरी कमरेला घोडा टेकावायचा
मग गरिबी दूर व्हायची
थापा गेल्यावर उगाचच भीती वाटली,
आता काहीतरी होइल !
तर च्यायला काहीच झालं नाही
शंकर्याचे बाबा कितीतरी वर्षं
सत्तरीच्या भिंगातून लोकसत्ता खोदून खोदून वाचायचे
आणि दुमडून ठेवून द्यायचे
त्यांना हार्ट ट्रबलही नव्हता
त्यामुळे त्यांची ओपन हार्ट सर्जरीपण झाली नाही
सकाळी सूर्याला रोज अर्घ्य द्यायचे
पण त्यांना कधीच ऑस्कर मिळालं नाही
कितीतरी वर्षं ते घराबाहेरच पडले नाहीत
की घरच्यांनाही ते गेल्याचं कळलं नाही
परवा शंकर्या म्हणाला,
रेशनकार्डावर त्याचं नाव कमी करायचंय
तर अर्ज लिहून द्या
अन् घोडपदेवचे युवक प्रतिष्ठान्वाले
म्हणाले,
आपण रे रोड स्टेशनला
सत्यजित रे रोड स्टेशन
नाव द्यायचा ठराव पाठवुया
- वाटेवरच्या कविता, अशोक नायगांवकर
0 अभिप्राय