मराठी कविता संग्रह

अनुमान

15:05 सुजित बालवडकर 0 Comments Category :

एकटाच मी काहीबाही बरळत बसलो!
उदास झालो कधी; कधी मी खिदळत बसलो!

कसले कसले अर्थ चिकटले या शब्दांना...!
घासघासले एकेकाला...विसळत बसलो!

गेलेला अन् येणाराही क्षण बेचव हा...
जुनी-पुराणी दुःखे सगळी चघळत बसलो!

अजून उरले चार थेंब हे आठवणींचे...
काळ लोटला; मन माझे मी निथळत बसलो!

या जगण्याच्या अनुमानाचे काय एवढे?
कशात काहीतरी आपले मिसळत बसलो!

- प्रदीप कुलकर्णी

RELATED POSTS

0 अभिप्राय