मराठी कविता संग्रह

मेंदूचा अभंग

19:30 Sujit Balwadkar 0 Comments Category : ,

काय आहे मेंदू ? | मेंदू विचारतो |
मेंदूच शोधतो | मेंदूला या ||

मेंदूतच आहे | दडले उत्तर |
नाही सापडत | मेंदूलाच ||


मेंदूलाच मेंदू | अनोळखी असा |
देहातून जसा | आत्माराम ||

'संदू' म्हणे मेंदू | पुरा वैतागला |
फुका शिणवला | जन्मभर ||

- मौनाची भाषांतरे, संदीप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय