रंग चालला सोडून अन पारा उडलेला
रंग चालला सोडून अन पारा उडलेला
कितीक वर्ष आहे मी असाच पडलेला
अंतरातूनी रंगबावरे उडता वादळ
...मजला त्यातील सफेद केवळ आवडलेला
मला लागती जन्मकळांचे रोजच वणवे
मीच त्यावरी कृष्णघनांसह गडगडलेला
चिमुटभर या दुःखाचे मज नाही ओझे
मी पृथ्वीचा भार साहुनी अवघडलेला
मी लाव्ह्याच्या सोबत आलो वाहून वरती
मी ना कोणा खणता खणता सापडलेला
- मौनाची भाषांतरे, संदीप खरे
1 अभिप्राय
संदिप खरे यांच्या सर्व कविता आपल्या मनाशी नातं जोडतात, तसेच नवीन विचारांची बीजही रोवतात. केवळ मनोरंजन करण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठीही मदत करतात.
ReplyDelete