मराठी कविता संग्रह

भल्या पहाटे निघून आले

15:49 Sujit Balwadkar 1 Comments Category :

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली...तुझ्याच स्वप्नात जाग आली...
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला ...
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही...
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !

- सुरेश भट

RELATED POSTS

1 अभिप्राय