नको ग नको ग आक्रंदे जमीन
नको ग नको ग आक्रंदे जमीन
पायाशी लोळत विनवी नमून
धावशी मजेत वेगात वरून
आणिक खाली मी चालले चुरून
छ्यातित पाडसी कितिक खिंडारे
कितिक ढाळीशी वरून निखारे
नको ग नको ग आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू बेहोश होउन
ढगात धूराचा फवारा सोडून
गर्जत गाड़ी ती बोलली माजून
दुर्बल अशीच खुशाल ओरड
जगात कशाला जगावे भेकड
पोलादी टाचा ह्या छय्यातित रोंउन
अशीच चेंदत धावेन धावेन
चलाले चक्रानो फिरत गरारा
गर्जत पुकारा अपुला दरारा
शीळ अन कर्कश गर्वात फुंकून
पोटात जळते इंधन घालून
शिरली घाटात अफाट वेगात
मैलाचे अंतर घोटात गीळीत
उद्दाम गाडीचे ऐकून वचन
क्रोधात इकडे थरारे जमीन
दुर्बल, भेकड, त्वेषाने पुकारी,
घुमले पहाड़, घुमल्या कपारी
हवेत पेटला सूडाचा धुमारा
कोसले दरीत पुलाचा डोलारा
उठला क्षणात भयान आक्रोश
हादरे जंगल, कापले आकाश
उलटी पालटी होउन गाड़ी ती
हजार शकले पडली खाली ती
कुसुमाग्रज
2 अभिप्राय
KHUP SUNDAR AHE. MALA HYA KAVITANCHA ARTHA SOPYA BHASHET SANGITALA TAR TE VACHAYALA AWADEL
ReplyDeleteutkrushta kavita.My all time favourite
ReplyDelete