मराठी कविता संग्रह

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस

22:14 सुजित बालवडकर 0 Comments Category :

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
थोडे घेउन ठेवून मग निघाला दिवस

कसे मुख मावळतीचे उदास उदास
तसा गार वारा वाहे जसा खोल श्वास
श्वास दुरच्या दिव्यांना देत निघाला दिवस

विझवून दिवसाचा दीप पेटवून रात
पडे देह अवनीचा या तमाच्या कुशीत
थोडा अधीरसा श्वास थोडा दिलासा दिवस

आता गावू द्यावे गाणे जसे गावू वाटे
अंगणात येतील स्वप्ने पहाटे पहाटे
गाव मन नाव ज्याचे त्याची ढासळते वेस

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
थोडे घेउन ठेवून मग निघाला दिवस

-संदिप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय