मराठी कविता संग्रह

गेलें उकरून घर

01:40 सुजित बालवडकर 0 Comments Category :

'फुलताना जे अडखळते; ते फूलच असते सडले'


चल. तुझी-माझी भातुकलीची सर्वव्यापी अवस्थांतरे गुंडाळून ठेवू या. आता हे जे इवलेसे घर कोसळलेले आहे ना त्याचा प्रश्न हाती घेऊ या.

गेलें उकरून घर,
नाही भिंतींना ओलावा;
भर ओंजळीं चांदणें,
करूं पाचूंचा गिलावा.
आण लिंबोणी सावल्या,
नाहीं आढ्याला छप्पर;
वळचणीच्या धारांना
लावूं चंद्राची झाल्लर.
पाय ओढत्या वाळूची
आण तेव्हांची टोपली;
कधी खेळेल अंगणीं
तुझी-माझीच सावली?
गेलें उकरून घर
जाऊं धुक्यांत माघारा,
कधीं पुरून ठेवल्या
आणूं सोन्याच्या मोहरा.

स्रग्धरे!..

मला माझाही दुरून सुगंध यावा अशी तू...

~ ग्रेस

RELATED POSTS

0 अभिप्राय