मराठी कविता संग्रह

मी निराशेने ग्रस्त होता तू उषा होऊन ये

01:43 सुजित बालवडकर 1 Comments Category :

मी निराशेने ग्रस्त होता तू उषा होऊन ये

कोरशी प्राजक्त वेणी कुंतली खोवून ये



या जगाच्या यातनांनी दृष्टी माझी कुंठता
तू उद्याची स्वप्नसृष्टी लोचनी घेऊन ये

जायबंदी आर्ष मुल्ये पाहूनी मी खंगता
दीपसा आरक्त त्यांचा तू टिळा लावून ये

संशयाच्या पायसांनी टोचिता माझी ध्ऱुती
क्षेम द्याया शाश्वताच्या चंदनी न्हाऊन ये

सूर माझा क्षीण होता शब्द होता पारखे
पैंजणे श्रद्धा श्रुतींची तू पदी लेवून ये

ता.क. एखादा शब्द इकडे-तिकडे झाला असण्याची शक्यता आहे.
कुणाकडे मूळ कविता असल्यास कृपया दुरुस्त करण्याची तसदी घ्यावी

- ग्रेस

RELATED POSTS

1 अभिप्राय