मराठी कविता संग्रह

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

01:33 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की, अजून ही चांद रात आहे

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?

कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !

[slider title="अधिक माहिती"]

अधिक माहिती


गायक/गायिका: लता मंगेशकर
संगीतकार: हृदयनाथ मंगेशकर
गीतकार: सुरेश भट
चित्रपट: उंबरठा
वर्ष: १९७७[/slider]

RELATED POSTS

0 अभिप्राय