मराठी कविता संग्रह

फुलतोस तू परंतू, जळतात लोक येथे

02:17 सुजित बालवडकर 0 Comments Category :

फुलतोस तू परंतू, जळतात लोक येथे
केव्हा तरी नव्याने कळतात लोक येथे
आम्ही तुझ्याच मागे ते सांगतात तुजला
सोडून एक‌‍ट्याला पळतात लोक येथे
हातात हात देती, तू चालशी पुढे अन्
अर्ध्यावरुन मागे वळतात लोक येथे
त्यांची वृथाच वचने, त्यांच्या वृथाच शपथा
मोडून शब्द अपुला ढळतात लोक येथे
त्यांची महान तत्त्वे, होती क्षणात खोटी
स्वार्थासमोर साध्या चळतात लोक येथे

- अविनाश ओगले

RELATED POSTS

0 अभिप्राय