मराठी कविता संग्रह

तू परत ये......

03:28 Sujit Balwadkar 0 Comments Category : ,

तू चुक मान्य करणार नाहीस हे मला माहीत आहे ,
म्हणुनच मी उगाच तुझी समजुत काढणार नाही;

तू परत यावीस असं मला मना पासुन वाटतं,
अजुनही तुझ्या आठवांचं आभाळ मनामध्ये दाटतं;

माझ्या सहवासातला प्रत्येक क्षण तुला हेच सांगेल ,
तुझ्याकडे तुझ्याचसाठी, माझी साथ मागेल ;

बघ, कोपर्‍यावरचा प्राजक्तही तुझ्या वाटेकडे डोळे लावून फुलायचा थांबलेला आहे,
किमान त्याच्यासाठी तरी तू परत ये.......

- अनामिक

RELATED POSTS

0 अभिप्राय