मराठी कविता संग्रह

एक कळी मात्र, उमलायचीच राहून गेली.......

03:27 सुजित बालवडकर 0 Comments Category :

एक कळी मात्र, उमलायचीच राहून गेली …….

वसंतात आज या, सारी बाग न्हाऊन गेली;
एक कळी मात्र, उमलायचीच राहून गेली.

झंकारली भग्न तार, ह्रदयाची माझ्या;
वेदना त्या जुन्या, पुन्हा सुलगावूनी गेली.

उजळले दीप, सर्वांच्या दारी;
रांगोळी माझ्या घरी, का अशी पुसटून गेली?

पुरविली वस्त्रे द्रौपदीस, लज्जारक्षणार्थ अच्युताने;
चंद्रमौळी नशिबात माझ्या, लक्तरे का राहून गेली?

जाहली त्रुप्त धरती, अळवाच्या बरसातीने;
झोपडी माझीच फक्त, त्या पुरात वाहुन गेली.

एक कळी मात्र, उमलायचीच राहून गेली…….

- कुलकर्ण्यांचा निरज!

RELATED POSTS

0 अभिप्राय