मराठी कविता संग्रह

जमलंच तर परत ये!!!

02:59 Sujit Balwadkar 0 Comments Category :

भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!

कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!

महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!

मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!

थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!

तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत ये!

- कुलकर्ण्यांचा निरज! ( inspired from a urdu gazal )

RELATED POSTS

0 अभिप्राय