मराठी कविता संग्रह

कविता नाहीये !!

13:19 सुजित बालवडकर 0 Comments Category :

Tanveer Siddiqui
कसं कर माहितीये

आधी स्वत:चेच खर्डे कर
फाड
न जमल्यास
पुन्हा कर
अन स्वत:ला ओत
निवळशंख, अगदी खरीखुरी
स्वत:च्या मेंदूत,
किंवा आरश्यात
हवं तर कागदात
पेनाने जमेल तो आकार दे
स्वत:ला समजून घे आधी

तू तुझ्या तुझेपणापासून काकुळतीला येईपर्यंत
स्वत:ची, स्वत्वाची, तुझ्या तत्वाची
तलफ भागवून घे आधी

मग माझा शोध घे
काढ उकरून मला तुझ्यातून
अन आकडेमोड कर माझ्या उणीवांचा
तुझ्यासाठी
माझ्यात काय काय
असण्याचा - नसण्याचा
हिशोबाला
फक्त माझ तुला समजलेलं प्रेम असू दे
हिशोबाला
फक्त तुला समजलेला मी असू दे

मग मला भेटायला ये
शेवटची तर शेवटची
आणि
दाखव तुझा अटटहास

मला बघायचय त्या आरश्यात

पण लक्षात ठेव
परत जाताना मी तुझ्यासोबत असेन - नसेन
पण
माझे खर्डे करू नकोस
फाडू नकोस
जमल्यास......


मी तुझी (पहाटे) सुचलेली कविता नाहीये !!
ऐकतेयस ना ?



.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}



- तनवीर सिद्दीकी

RELATED POSTS

0 अभिप्राय