मराठी कविता संग्रह

तेंव्हा आपण भेटू

19:58 Sujit Balwadkar 1 Comments Category :

Unaad

ढगांचे पुंजके जेंव्हा आकाशाच्या निळ्याभोर छताला लगडलेले असतील......
तेंव्हा आपण भेटू.......

मौनाच्या तलम अस्तराखाली जेंव्हा बेभान संवाद वाहत असतील.......
तेंव्हा आपण भेटू......


या राकट देहावर जेंव्हा तुझ्या पदरातून चांदणं
पाझरत असेल......
तेव्हा आपण भेटू...

कुणाच्यातरी तोंडून एकमेकांच नाव ऐकल्यावर उगाच बावरल्यासारखं होईल.......
श्वास आखुड होतील.....
तेंव्हा आपण भेटू......

चारचौघांत एकमेकांपासून अगदी गुन्हेगारासारखं तोंड लपवावसं वाटेल !!
तेंव्हा आपण भेटू.......

जेंव्हा "झोप का येत नाही?" ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल!
तेंव्हा आपण भेटू.......

मनात येईल तेंव्हा नकोच.....

- उनाड ...

RELATED POSTS

1 अभिप्राय