मराठी कविता संग्रह

किनारा

15:31 Sujit Balwadkar 1 Comments Category :

Unaad

सुरूवात कुठून करावी,
ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण....

जीवंतपणाच्या मर्यादा ओलांडलेला, ओशाळ, खारट पण,
रोज बाष्पीभवन होतं ह्या नावाखाली नवा, टवटवीत वाटणारा समुद्र!

हातचं राखून बोलणारी तू!
अन् हात हाती धरून बोलणारा मी!!
ह्यातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करणारा केविलवाणा किनारा.......

.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}- उनाड ...

RELATED POSTS

1 अभिप्राय