तिथेच चाक रुतते
तिथेच चाक रुतते,
अन् तिथेच घात होतो
धर्माच्या चाकरीचा,
असा रक्तपात होतो
त्या वादळाने जाताना
ईतकेच सांगितले होते,
"मी ध्वज नव्हतो कुणाचा
मी झंझावात होतो"
अर्ध्य वाहिले ज्याने त्याची
ओंजळ रितीच राहिली . . .
अशा दानशूराचा असा,
शोकांत सुर्यास्त होतो . . .
ना कोणता अवतार लागतो
ना कोणता चमत्कार,
ह्या वीरांचा परिचय
फक्त रणांगणात होतो . . .
.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}
- उनाड ...
0 अभिप्राय