सख्या रे, घायाळ मी हरिणी
हा महाल कसला रानझाडि ही दाट
अंधार रातिचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव
केलि कशी करणी ?
सख्या रे, घायाळ मी हरिणी
काजळकाळी गर्द रात अन् कंप कंप अंगात
सळसळणाऱ्या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी
गुपित उमटले चेहऱ्यावरती, भाव आगळे डोळ्यात
पाश गुंतले नियतीचे रे, तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - सामना (१९७५)
राग - सोहनी (नादवेध)
1 अभिप्राय
mala hi kavit khup avadli ani kaharch khup chan ahe
ReplyDelete