मराठी कविता संग्रह

नाहीतर लढता येणार नाही

21:45 Sujit Balwadkar 5 Comments Category :

मनस्वी

इतकी वर्षं लोटली तरी
जखमा अजून ताज्याच आहेत…
आग देऊनही गोठून राहिलेल्या
संवेदनाही माझ्याच आहेत…

आता आता कुठे मला…
थोडं थोडं जाणवू लागलंय..
आता आता कुठे माझं
डोळ्यातलं पाणी आटू लागलंय…

क्षितिज खूप दूर आहे…
आताशी पाऊल पडू पाहतंय
दिवस व्हायला अवकाश आहे…
आताशी अंधार मिटू पाहतोय…

होईल होईल म्हणता म्हणता
होईलसुद्धा ठीक सारं…
वाहील वाहील म्हणता म्हणता
वाहीलसुद्धा बदलाचं वारं…

मला मात्र तरीही सारं
विसरून काही चालणार नाही…
जखम ताजीच ठेवावी लागेल..
नाहीतर लढता येणार नाही…

- मनस्वी - Vinayak V Belose

RELATED POSTS

5 अभिप्राय