मराठी कविता संग्रह

नाईटलॅम्प आणि अभंग

01:13 सुजित बालवडकर 1 Comments Category :


Share on Facebook





इथे अंधार नेस्तनाबूत करण्याच्या इर्ष्येने
पेटलेल्या दिव्यात
शरीरावरचे लेप अधिकच गहिरे होतात,
गावाकडे आता कोणीतरी
स्वतःचा चेहरा पुसावा एवढ्या आत्मीयतेने
कंदील पुसून ओसरीवर टांगला असेल

इथे
सांजवेळी बंद असणार्‍या दारावर
चिमण्या बसत नाहीत
गावाकडच्या थोराड दारावर मात्र
चिमण्यांनी उच्छाद मांडला असेल,
रात्रीचं प्रक्षेपण संपताना
नाईटलॅम्प लागेल
आणि देह होउन जातील एक साधन
(झोपताना दारावरची बेलही मुकी केली जाते)
गावाकडे मात्र दिव्याची वात फुंकून
अंग टाकलेल्या देहाभोवती
पारावरचा अभंग घुमत राहतो

- "तूर्तास", दासू वैद्य

RELATED POSTS

1 अभिप्राय