मराठी कविता संग्रह

आयुष्य तेच आहे (ही प्रसिद्ध गझल नवीन शेरांसह)

00:48 सुजित बालवडकर 1 Comments Category :

आयुष्य तेच आहे
अन् हाच पेच आहे...

आता म्हणू उन्हाला
हे चांदणेच आहे...

सुख पांघरू कसे मी
ते तोकडेच आहे...

रक्तास जात नाही
ते तांबडेच आहे...

कोणी न सोबतील
हेही बरेच आहे...

झेलीत वादळांना
घर हे उभेच आहे...

वाटेत आजच्याही
मागील ठेच आहे...

अंतीम घे भरारी
नभ मोकळेच आहे...

तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे...

ह्या मैफिलीत गाणे
तुमच्यामुळेच आहे...

टाळू शके न कोणी
जे व्हायचेच आहे...

कोणी नसे कुणाचे
बस्! सत्य हेच आहे...

तू प्रेम दे जगाला
मग ते तुझेच आहे...

आरंभ ज्यास ते ते
संपायचेच आहे...

मॄत्युही जन्मलेला
जन्मासवेच आहे...

मी चालते तरीही
आहे तिथेच आहे...

केलीस याद तूही
का हे खरेच आहे?...

- "ती भेटते नव्याने", संगीता जोशी

RELATED POSTS

1 अभिप्राय

  1. "खिडकीलाही डोळे असतात" ...अन भिंतीलाही असतात कान \ काळ्या कभिन्न काळोखालाही असते, सूर्योदयची जाण.. ही जाण सर्वांना असली पाहिजे , म्हणून कविता वाचली पाहिजे ... सुनील गांभिरे .

    ReplyDelete