मराठी कविता संग्रह

आज कळेना हे मला.......!!!

20:53 Sujit Balwadkar 0 Comments Category :

आज कळेना हे मला
माझ्या जीवाचा जिव्हाळा
जसा भिजवतो सृष्टीला
ओला चिंब पावसाळा.....

आज कळेना हे मला
स्मित हास्य ओठांवरी
खळी अलगद गालावरी
शब्द न बोलती काही
भाव सारे चेहऱ्यावरी....

आज कळेना हे मला
मनात गोड आठवांचा झुला
सावरता क्षण मिलनाचा आला......

आज कळेना हे मला
पृथ्वीचा ह्या स्वर्ग कसा झाला?
दरबारी साऱ्या अप्सरांचा ताफा
सुगंध जसा दरवळी सोनचाफा.....

आज कळेना हे मला
का झालो मी निराळा?
होतो प्रत्तेकाच्या जीवनात,
तसा सुंदर स्पर्श तुझ्या प्रेमाचा मज झाला...!!

-समर्थ प्रेरणा प्रकाश देव.

RELATED POSTS

0 अभिप्राय