मराठी कविता संग्रह

' त्रास '....( गझल )

19:26 Sujit Balwadkar 2 Comments Category :भिंती दुखावलेल्या, वासे उदास आता
माझ्या घरास होतो माझाच त्रास आता !!

परसात चंदनाच्या बाभूळ वाढलेली
होतोच रोज येथे माझाच ऱ्हास आता !!

'हा' ही इथेच होता 'तो' ही इथेच होता
कोणीच का दिसेना मज आसपास आता !!

निसटून काय गेले कळले मला कधी ना
सांभाळतो उराशी माझेच भास आता !!

का सैरभैर झाले आभाळ आसवांचे
पाऊस भार झाला या अंगणास आता !!

पान्हाच आटलेला ममतेस दोष नाही
खोट्या सुखास येथे खोटी मिजास आता !!

ममता सिंधुताई

RELATED POSTS

2 अभिप्राय