मराठी कविता संग्रह

त्या जगाला न सांगण्यासारखं

17:11 Sujit Balwadkar 1 Comments Category :


ती बर्‍याच वर्षानी भेटायला आली.
माझ्याकडे पाहण्याचे टाळून
माझी कविताची वही उघडून वाचायला घेतली.
... ....
मधूनच वर मान करून अनाकलनीय नजरेने
माझ्याकडे पहात तिनं विचारलं
'हे सगळं त्या जगाला सांगण्याचा अधिकार
तुला कुणी दिला ?"
मी नेहमीप्रमाणे निरुत्तर!
...
वहीचं शेवटचं कोरं पान पाहून
तिने माझ्याकडे पाहून आपले बाहु पसरले,म्हणाली
'चल,ये,आपण दोघे मिळून..लिहू या काहीतरी..
या शेवटच्या पानावर..
त्या जगाला न सांगण्यासारखं ! '

- जयंत कुलकर्णी

Image Courtesy - जयंत कुलकर्णी

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

1 अभिप्राय