मराठी कविता संग्रह

चकवा..!

16:32 Sujit Balwadkar 0 Comments Category :

आली तुझी अफ़वा पुन्हा
झालो किती हळवा पुन्हा

रेषा तुझी माझी कुठे
शोधू नको तळवा पुन्हा

रक्तात काही उसळते
पण भेटती जळवा पुन्हा

निवडून झालो मोकळे
एकत्र या, फसवा पुन्हा

टाळू तुझा दरवळ किती
श्वासात तीच हवा पुन्हा

ओळख तुला माझी नवी
माझा मला चकवा पुन्हा..

– अभिजीत दाते
मूळ दुवा - http://wp.me/p3KYc-5M


अभिजीत दाते यांच्या आणखी कविता इथे वाचा

RELATED POSTS

0 अभिप्राय