मराठी कविता संग्रह

रात्रीस काय झाले

22:57 सुजित बालवडकर 5 Comments Category :

त्या धुंद पावसाळी रात्रीस काय झाले?
धुंदावल्या दिशाही, रात्रीस काय झाले?

प्रौढी कळ्यांस होती त्यांच्या कुवारतेची
झाली फुले कळ्यांची, रात्रीस काय झाले?

बहरून काजव्यांनी तेजाळली धराही
लाजून चंद्र गेला, रात्रीस काय झाले?

मी पाहिली धरेची शोभा भल्या पहाटे
रात्रीत काय चाले? रात्रीस काय झाले?

पायास स्पर्श ओला नाजूकसा दंवाचा
की आंसवे निशेची? रात्रीस काय झाले?

अंधार दूर होता, दारात सूर्य आला
ती धुंदली कशाने? रात्रीस काय झाले?

ती एकटीच जागी, विश्वास सौख्य द्याया
निजली भल्या पहाटे, रात्रीस काय झाले?

****************************************************
वृत्त : आनंदकंद
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा

- विशाल कुलकर्णी

मूळ दुवा - Vishal Kulkarni

RELATED POSTS

5 अभिप्राय

  1. ganesh bhand14/11/2012, 23:09

    फारच छान कविता आहे

    ReplyDelete
  2. संकेत श्री. सावळे21/11/2012, 16:52

    कविता करायची म्हणून शब्दांचा नुसताच खेळ मांडायचा नसतो...तर कविता जगावी लागते...त्या स्वतंत्र दुनियेत स्वच्छंदपणे विहार करावा लागतो... हा विहार येथे स्पष्टपणाने दिसून येतो...उत्तम कविता आहे.

    ReplyDelete
  3. पाटील प्रियांका पांडुरंग29/11/2012, 21:16

    वाचताना खूप समाधान वाटल

    ReplyDelete
  4. Hemalata Thite27/12/2012, 18:39

    ती एकटीच जागी, विश्वास सौख्य द्याया
    निजली भल्या पहाटे, रात्रीस काय झाले?..............Khuuup Sundar!!!!!

    ReplyDelete
  5. Anjali Rane Wade30/01/2013, 21:40

    Khup chan, mastach...............

    ReplyDelete