पोटमाळा
माझ्या घऱाप्रमाणे
माझ्या मनातही
आहे एक पोटमाळा..
जिथे टाकून दिल्या आहेत
कितीतरी तुटक्या-फुटक्या, वापरात नसलेल्या आठवणी..
ज्या आहेत तिथे वर्षानुवर्ष.
बरेचदा काढतो.
अन् त्यावरची धूळ झटकून,ठेवून देतो पुन्हा तशाच !
त्या जपून ठेवण्याची कारणं माहीत नाहीत आणि
फेकून देण्यासाठी कारणं सापडत नाहीत.
मात्र कधी कधी
माझं सुंदर, चकचकीत वर्तमान..बिघडलं किंवा निखळलं की
तात्पुरतं सांधायला किंवा सांभाळायला
उपयोगी पडतात
त्या तुटक्या-फुटक्या आठवणी
बिजागिरी, सांधा किंवा खिळा म्हणून....
आणि काम भागतं
मॉलमधे जाऊन पुन्हा सुंदर, चकचकीत, नवीन वर्तमान आणेपर्यंत!
- जयंत कुलकर्णी
Image Courtesy - जयंत कुलकर्णी
अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
1 अभिप्राय
mast kavita!
ReplyDelete