मराठी कविता संग्रह

निर्माल्य

14:40 Sujit Balwadkar 6 Comments Category : ,मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
- ती होता होता बायको ओरडते
- मध्यरात्री कुत्री ओरडतात
- पहाटे पहाटे कोकिळा ओरडते
- आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो.......

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
- ती होता होता कविता आठवते
- मध्यरात्री प्रेयसी आठवते
- पहाटे पहाटे अंथरून ओलं करणारी धाकटी आठवते
- अन उजाडता उजाडता काल विसरलेली औषधाची गोळी आठवते.........

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
- ती होता होता मद्यात असते
- मध्यरात्री गद्यात असते
- पहाटे पहाटे पद्यात असते
- अन उजाडता उजाडता पुन्हा एकदा 'सध्यात' असते........

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
- ती होता होता कळी असते
- मध्यरात्री फुलण्याची इच्छा असते
- पहाटे पहाटे कळीच फूल असते
- अन उजाडता उजाडता फक्त निर्माल्य असते........


- नेणिवेची अक्षरे, संदीप खरे

Image courtesy: http://www.bookganga.com


आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

6 अभिप्राय