मराठी कविता संग्रह

ह्या कशा उबदार ओळी...

17:09 सुजित बालवडकर 4 Comments Category :

ह्या कशा उबदार ओळी , शब्द हे कसले पुन्हा
हाय! सच्च्या कल्पनेला चांदणे डसले पुन्हा

"मोगरा,जाई,जुई,चाफ्याविना कविता कशी?"
उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा

हुडहुडी भरली मनाला , आसवेही तापली
काय माझे विकतचे दुखणेच ठसठसले पुन्हा?

कागदांवर मावली नाहीच का नियमावली?
कायदे धाब्यावरी जाऊनही बसले पुन्हा !

एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले
"काय आम्ही वारलो का?" देव खेकसले पुन्हा

ही गज़ल लिहिताच आला सर्रर्रकन काटा जुना
मी पुन्हा फसताच सारे लोकही फसले पुन्हा

"आयला ! असला कवी नाहीच झालेला !" म्हणे
आज केले माफ ! पण बोलू नका असले पुन्हा

- वैभव जोशी

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

4 अभिप्राय

  1. “आयला ! असला कवी नाहीच झालेला !” म्हणे
    आज केले माफ ! पण बोलू नका असले पुन्हा.............खूप मस्त वाटली हि रचना...

    ReplyDelete
  2. अमित अंजर्लेकर16/06/2012, 04:36

    वैभव जोशी यांच्या सा-याच कविता खुप छान आहे

    - अमित अंजर्लेकर

    ReplyDelete
  3. Hemalata Thite21/06/2012, 18:09

    एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले
    “काय आम्ही वारलो का?” देव खेकसले पुन्हा.....................sundar Kavita

    ReplyDelete
  4. tumachya kavitet ek freshness aahe..

    asach chan chan vachayala milel tumachyadadun he apexa

    ReplyDelete