मराठी कविता संग्रह

शेवटी असच

00:54 सुजित बालवडकर 1 Comments Category :

एक मी, आणि माझ काय चुकतंय ?
थकलो आता , हा विचार करता करता !
एक मासा, त्याला रडताच येत नाही .
कि अश्रूंतच पोहतोय , जगता जगता !
एक पणती, चरचरत जळणारी ;
सर्व बाजूनी , अंधाराशी लढता लढता !
एक लपंडाव, दोन भूतांचा ;
जन्म आणि मृत्यू मधून , चालता चालता !
एक तू , फक्त मूक प्रेम करणारी ;
ओठ दाबून, बोटांशीच खेळता खेळता !
शेवटी काय ? दोघेही जगतोयच .....
एका बिंदू भोवती , वर्तुळ काढता काढता !!

- डॉ पराग कुलकर्णी

RELATED POSTS

1 अभिप्राय