मराठी कविता संग्रह

सुचलंच नाही काही तर....

01:35 Sujit Balwadkar 1 Comments Category :

खोडून काढतोय रोज स्वतःला
तरी शिल्लक पुसटसा राहतोय
मी तोडलेल्या माझ्याच लचक्याचा
बेहिशेबी निळा काळा ठसा पाहतोय

ओठांकडून न्याय मिळेना कधीचा
दातखिळी मागे शब्द मोर्चे बांधतोय
संथ चाललंय त्या विचारांचं मंथन
विषय रोजचाच,मेंदू चर्चेच तानतोय

ओल्या कागदांचा ढीग कोरड्यावर
अर्धवट पानात,मी समाधान मानतोय
कुरतडलेल्या ढगांचा पंचनामा करून
शिळ्याच पाण्याचा पाऊस आणतोय

कल्पनांच्या घड्या कितेकदा मोडल्या
तुटल्या स्वप्नांना आकाशी बांधतोय
उडत्या काव्य पाखरांवर स्वार होतो कधी
कधी नव्या पानावर जुन्यानेच रांगतोय

- निलेश लेंडे

RELATED POSTS

1 अभिप्राय