एकदा तरी…
करेन वादग्रस्तसे विधान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
सदैव भालदार चोपदार का रहायचे
बनेन नाटकात या प्रधान एकदा तरी
तुला स्मरून काव्य रोज धाडले तुझ्याकडे
बघायचेस कागदी विमान एकदा तरी
उधार देत देत मी दिवाळखोर जाहलो
नफ्यात चालवेन का दुकान एकदा तरी
किती भकार अन् किती फुल्या फुल्या लिहायच्या
जपून वापरायची जबान एकदा तरी
चुना, लवंग कात टाकुनी तयार जाहले
खुशाल पिंक मार खाच पान एकदा तरी
कशास नेहमीच बाँड, बॅटमॅन पाहिजे
बघायचा उगीच शक्तिमान एकदा तरी
उमटवून मी किती बूटास घ्यायचे तिच्या
क्युपीड, रोख तिजवरी कमान एकदा तरी
– अभिजीत दाते
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
5 अभिप्राय
खर सांगू मित्रा, सादेची भाषा साद देणार्यालाच कळते पावसाचे पाणी जमिनीतच मुरते कोण्यातरी दर्दी वाचकांची भावना दुसर्या दर्द्यालाच कळते
ReplyDeleteअभिजित,
ReplyDeleteखूप छान कविता आवडली. - गजानन लोखंडे
gajhal ......jeev ghete re gajhal......
ReplyDeleteapratim nehamisarakhi....
anuja
mala prem kunavar karave hi kavita havey... jar kunakade asel tar plz rmail kara ... nimisha.jagtap@gmail.com
ReplyDeleteverry good kavita
ReplyDelete