19:22 सुजित बालवडकर 1 Comments Category : अशोक नायगांवकर
ज्योतिबा
आभार !
तुम्ही तिला
उंबरठ्याच्या
बाहेर आणून
त थ द ध
प फ भ म
शिकवलेत
आणि
कितीतरी
फरक पडला
आता तिला
सही निशाणी
डाव्या अंगठ्यासाठी
शाई फासावी लागत नाही
आता ती स्वत:च लिहू शकते
घासलेट ओतून घेण्याआधी
(मागे राहिलेल्या चिमण्यांना
कष्ट होऊ नयेत म्हणून )
'मी स्वखुशीने
जाळून घेतेय'
- अशोक नायगांवकर
1 अभिप्राय
घासलेट ओतून घेण्याआधी
ReplyDelete(मागे राहिलेल्या चिमण्यांना
कष्ट होऊ नयेत म्हणून )
'मी स्वखुशीने
जाळून घेतेय' hyacha arth samju shakel ka