मराठी कविता संग्रह

पुन्हा लागो नये भुक

18:14 सुजित बालवडकर 0 Comments Category :

भ्रमंतीच्या नाक्यावर
जरा गावांचे आडोसे
अरे पोरा, नको बघू
बरे आभाळ आभाळ

नाही रानाचा आधार
नाही पायाखाली जोते
काटक्यांच्या शिशिरात
माय चुलीशी खोकते

एका भाकरीत कसे
भरे अर्धेच हे पोट
त्याला तहान आसरा
वर पाणी घोट घोट

नाही पसरलो कोठे
नाही रुतलो मूळाशी
ओझ्या-गाठोड्यांच्या संगे
गाढवांचे धनी झालो


विठो, तुझ्या पायी आता
मागे अखेरची भीक
देरे, अशी दे भाकरी
पुन्हा लागो नये भुक

- अशोक नायगांवकर

RELATED POSTS

0 अभिप्राय