मी म्हणालो बायकोला - अशोक नायगांवकर
मी म्हणालो बायकोला, आजपासून प्रेयसी तू
ती म्हणाली, यापुढे चोरून भेटू
मी किनार्याचा तिला पत्ता दिला
ती बिचारी खरकटी उरकून आली
मी तिला फेसाळ लाटा दाखविल्या
ती म्हणाली, दूध हे जाते उतू
ती म्हणाली आठवा वर्षे जुनी
मी म्हणालो, काळ सारा गोठला
रूम मित्राने दिली एकांत रात्री
ती म्हणाली राहिली पोरे उपाशी
परतलो मग शेवटी आपल्या घराला
ती म्हणाली, कोणती भाजी डब्याला ?
- अशोक नायगांवकर
( वाटेवरल्या कविता)
[gfmdonate]
5 अभिप्राय
strivishwa che antarang mandanari sunder kavita
ReplyDeleteAll the poems are very excellent.Deepak Agwan
ReplyDeleteshevti vastavat rahayla shikvte ti bayko ...
ReplyDeletezakkas......kas ky sucht...ho tumhala....?
ReplyDeletewww.marathikavitasangrah.com ला भेट द्या.
ReplyDelete