पारोशाने नदी म्हणाली - अशोक नायगांवकर
पारोशाने नदी म्हणाली
किती दिसात गं न्हाले नाही
मरता मरता झाड म्हणाले
दोन थेंब तरी पाणी द्या हो
शाहाणपटीने धारण बांधले
अभियंत्यांना मुता म्हणालो
गाळ म्हणाला धरणाचीया
किती उंचवर बांधू समाधी?
खडी फोडते बहिणाबाई
ओवीला बघ रक्त चिकटले
रिताच हंडा वणवण फिरतो
फक्त खालची माय बदलली
असा कसा गं श्रावणास हा
विशाखाचा चटका बसला
गाव म्हणाले पाणी पाणी
आम्ही गळ्यातून गाणी म्हटली
त्या तुकयाची गाथा बुडता
नदीत अवघी ओल पसरली
या कवितेची वही बुडविण्या
एक तरी हो डोह राहू द्या
- अशोक नायगांवकर
( "खुपते तिथे गुप्ते " या कर्यक्रमात सादर केलेली कविता )
0 अभिप्राय