जो तो पळून जातो ऐकून ही कहाणी
एका गझलेच्या मिसर्यावर दुसर्या गझलकाराने लिहिलेली गझल म्हणजे तरही गझल. हल्लीच मराठी कविता कम्युनिटीवर असा उपक्रम झाला.
‘जो तो पळून जातो ऐकून ही कहाणी’ हा मिसरा दिला होता. त्यावर या मिसर्यातले वेगवेगळी रदिफ आणि काफ़िये घेऊन गझल लिहिण्याचा हा पहिला प्रयत्न…
जो तो पळून जातो ऐकून ही कहाणी
साथीस फ़क्त उरते डोळ्यांमधील पाणी
उपभोग त्याज्य नाही, अध्यात्म वर्ज्य नाही
ओठात लावणी, अन् पोटी अभंगवाणी
पडलो कितीकदा मी मोहात थांबण्याच्या
लावीत विश्व गेले दैवा तुझी पिराणी
माझ्या वहीस गेले धुडकावुनी पुढे ते
आजन्म लाभली ना त्यांना तुझी निशाणी
दुःखे व्यथा अहर्निश असतात सोबतीला
का एवढे सुखाने व्हावे मनुष्यघाणी
येथून कोळशाचे तुमचेच शब्द आले
मी वेचले हिर्यांना हिंडून त्याच खाणी
– अभिजीत दाते
वृत्त – आनंदकंद
(गा-गा-ल-गा-ल-गा-गा, गा-गा-ल-गा-ल-गा-गा)
http://dilkhulas.wordpress.com/2010/11/12/%e0%a4%9c%e0%a5%8b-%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%90%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be/
0 अभिप्राय