02:08 सुजित बालवडकर 0 Comments Category : अभिजीत दाते , गझल
केव्हातरी सांगेन मी
मौनातुनी बोलेन मी
तू सोबतीची दे हमी
आजन्म रेंगाळेन मी
वेचायला येशील ना
चाफ़्यापरी सांडेन मी
शोधू नको जाईजुई
स्वप्ने तुला माळेन मी
हो प्रीत नंदादीप तू
आयुष्य ओवाळेन मी
हे प्रेम दहशतवाद जर
निःशंक तो लादेन मी
घाला तनूला कुंपणे
शब्दातुनी लांघेन मी
- अभिजीत दाते
0 अभिप्राय