मराठी कविता संग्रह

आक्रोश

02:04 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

का तोल पापण्यांना सांभाळता न आले
आरोप हे मलाही फेटाळता न आले

वाटांवरी अता या थांबायचे कशाला
होते मनात तेव्हा, रेंगाळता न आले

होतो तुझ्यापुढे मी प्याला जुन्या सुरेचा
तू ओठ लावुनीही फेसाळता न आले

गाऊ नका पवाडे नक्षत्र तारकांचे
शब्दांविना कुणाला तेजाळता न आले

जेव्हा तुझ्या जगाचा आक्रोश पाहिला मी
माझ्याच वेदनांनी, किंचाळता न आले

– अभिजीत दाते (२६-१०-२०१०)

http://dilkhulas.wordpress.com/2010/10/29/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6/

RELATED POSTS

0 अभिप्राय